लोहारा :- रामनवमी निमित्त परंडा तालुक्यातील डोमगाव येथील ऐतिहासिक व पुरातनकालीन श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे व कल्याणस्वामींच्या समाधीचे भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सहपरिवार दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस व डोमगावचे माजी सरपंच, कल्याणसागर बॅंकचे संचालक मनोहर मिस्कीन, भाजपा उद्योग आघाडी धाराशिव जिल्हा सहसंयोजक हनुमंत पाटील, दीपक गायकवाड, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.