लोहारा :- शहरातील ग्रामीण रुग्णालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त डायलिसिस युनिट चे उदघाटन नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्या हस्ते दि.7 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, उबाठा गट, शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेविका आरती कोरे, नगरसेवक जालिंदर कोकणे, विजयकुमार ढगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक आयुब शेख, रुग्णकल्याण समिती सदस्य डॉ.बाळासाहेब भुजबळ, उबाठा गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, पत्रकार बालाजी बिराजदार, प्राचार्य शहाजी जाधव, अदि उपस्थित होते. तसेच दुपारी 1 वाजता आ.प्रविन स्वामी, उबाठा गट शिवसेना जिल्हा संघटक दिपक भैय्या जवळगे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देवून डायलिसीस युनिट पाहणी करून शुभेच्छा दिल्या. प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून डायलिसीस युनिटचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र पापडे, वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रस्ताविक करून जागतिक आरोग्य दिनानिमित्त “आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य” या ब्रीद वाक्य चे विश्लेषण करून रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा- सुविधा व डायलिसीस युनिट बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सदरील कार्यक्रमाचे मंत्री मोहदयाच्या हस्ते होणाऱ्या उदघाटनाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालय, लोहारा चे वैद्यकिय अधीक्षक डॉ.रवींद्र पापडे, डॉ. गोविंद साठे, डॉ.खमीतकर मॅडम, डॉ. सुनील मंडले, सुनील व्हनमाने HLL क्लस्टर हेड, इलाई शेख जिल्हा समन्वयक डायलिसीस विभाग व सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दस्तगिर मुजावर यांनी केले तर आभार अंगद गिराम यांनी मानले.