परंडा :- तालुक्यातील डोमगाव येथील श्रीक्षेत्र श्रीराम मंदिर व कल्याणस्वामी समाधी स्थळ येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंडा चे तहसीलदार निलेशजी काकडे यांनी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार निलेशजी काकडे यांच्या वतीने सर्व जनतेला पेढे (शेरनी) वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंदिराचे मठपती संजयकुमार जागीरदार यांनी तहसीलदार निलेशजी काकडे यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.