उमरगा :- श्रीराम नवमी निमित्त सकल हिंदू समाज उमरगा यांच्यातर्फे दि. ७ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शोभायात्रेचे उद्घाटन डॉ. कपिल महाजन, किरण गायकवाड, सयाजी चालुक्य-पाटील, आकांक्षा चौगुले, ॲड. साईराज टाचले,श्रीधर ढगे, समर्थ दंडगे, संतोष वकारे, गणेश अहंकारी, आणि संदीप चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीरामाची भव्य मूर्ती आणि विविध वयोगटातील युवकांनी सादर केलेले मर्दानी खेळ. तसेच, धार्मिक संगीताच्या माध्यमातून वातावरणात भक्तिभाव निर्माण करण्यात आला.शोभायात्रा कळस तांब्या येथून प्रारंभ होऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे उत्साहात व सुव्यवस्थीतरित्या समाप्त झाली.या शोभायात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी श्रम घेतले. मितेश राकेलकर, अनुज सगर, ऋषी गोसावी, ओम पाटील, किशोर जाधव, प्रतीक मुगळे, निखिल सगर, प्रदीप मुळे, सुनील सूर्यवंशी, संदेश स्वामी, कार्तिक कुंभार, विष्णू इसराजे, सुरज शिंदे, अक्षय स्वामी, बजरंग बिराजदार, वैभव मोरे, महेश राकेलकर, लक्ष सुपतगावकर आणि इतर कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता.कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत पोलीस प्रशासनाचे योग्य सहकार्य लाभले, त्यामुळे शोभायात्रा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.