उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांची दमदार कामगिरी ’01 गावठी पिस्टल, 04 जिवंत राऊंड, 06 कोयते व 01 सुरी असे घातक शस्त्र व वाहनासह 01 आरोपीस केले जेरबंद’ 

0
266

उमरगा :-  येथील सदाशिव शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजुस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये कार क्र. MH-25-AB-6279 यामध्ये आलेल्या एक काळा शर्ट घातलेल्या इमसाने त्याचे कमरेमध्ये एक पिस्टल बाळगलेला आहे व तो कॅफेच्या वरच्या मजल्यावर बसलेला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांनी पो.नि.अश्विनी भोसले, पो उपनिरीक्षक अनुसया माने, पोहेकों बोयणे, पोहेकॉ सोनवणे, पोना अवचार, पोकॉ थोरे, पोकों कांबळे, पोकों जाधव यांना छापा बाबत मार्गदर्शन करून व आदेश देवुन कारवाई करीता पाठविले. वरील अधिकारी व अंमलदार यांनी 14:15 वा. छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजुस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये पंचासह गेले असता कॅफेच्या वरच्या मजल्यावरून एक काळा शर्ट घातलेला इसम हा खाली उतरून कॅफे समोर लावलेल्या कार क्र. MH-25-AB-6279 जवळ गेले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव सुशील संतोष शहापुरे रा.तुरोरी ता.उमरगा जि.धाराशिव असे सांगीतले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक 25000 रू. किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व 04 जिवंत राऊंड मिळुन आले. तसेच त्याचे ताब्यातील कार क्र. MH-25-AB-6279 ची झडती घेतली असता सदर कारचे पाठीमागील डिक्कीमध्ये 3500 रू. किमतीचे 06 कोयते व एक सुरा असे अवैध हत्यार विना पासपरवाना बाळगल्याचे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन देशी बनावटीचे 01 पिस्टल, 04 जिवंत राऊंड, 06 कोयते, 01 सुरा व वापरलेली कार क्र. MH-25-AB-6279 असे एकुण 2.53.500 रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. उमरगा येथे गुर.नं. 222/2025 कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास सपोनि पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अशफक आमना उपविभागीय पोलीस अधिकारी उमरंगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि अनुसया माने, पोहेकॉ संतोष बोयणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, पोनी.महेश अवचार, शिवराज थोरे, पोकॉ. आनंद कांबळे, पोकों बालाजी जाधव यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here