लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी ची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

0
195

लोहारा:- ग्रामीण भागात ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे देशात लोकशाही बळकट करण्यासाठी व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्य शासन व केंद्रशासन यांच्या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करून गावचा विकास साधण्यासाठी ही निवडणूक असते या निवडणुकीत गावचा पुढारी होण्याचं व गावचा प्रथम नागरिक चा मान मिळवण्यासाठी स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केलेली असते परंतु शासन निर्णयाप्रमाणे गाव पातळीवर समाजातील सर्व घटकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी सरपंच पदासाठी आरक्षण पद्धतीने सोडत करण्यात येते त्याच अनुषंगाने लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी ची आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले (मांजरा प्रकल्प धाराशिव) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लोहारा पंचायत समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी, सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे अवाहान तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here