लातुर – उमरगा रोड वरील माडज पाटी जवळ ट्रॅक्टर- कारचा अपघात दोन मयत,एक जखमी 

0
663

उमरगा- तालुक्यातील माडज पाटी जवळ लातुर- उमरगा रोडवर ट्रॅक्टर- कारचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाल्याची घटना दि.13 एप्रिल रोजी रात्री घडली आहे.

उमरगा चौरस्ता येथुन माडज कडे जाणारी कार क्रमांक MH22 BC 9597 समोर जाणाऱ्या टॉक्टर ला जोराची धडक देऊन कार पल्टी होऊन त्यातील तीघे जखमी होऊन दोघे मयत व एक गंभीर जखमी झाला असून, जखमीचे नाव घनश्याम खुरडे राहणार – माडज असे आहे. , तर आशा बळीराम पवार, प्रविण नागनाथ दंडगुले राहणार परभणी या दोघे जखमीनां रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टर ने तपासुन मृत घोषित केले.सदर अपघाताची माहीती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा व विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहीती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here