लोहारा:- दि.6 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या दरम्यान लोहारा येथील भारतमाता मंदिर याठिकाणी रामनवमी ते आंबेडकर जयंती या 10 दिवसा दरम्यान वय वर्ष 5 ते 14 वर्ष या वयोगटातील बालकांचा रा.स्व.संघ, जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्प यांच्या माध्यमातून बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बालकांना प्राणायाम, योगासन, सूर्य नमस्कार, मैदानी खेळ, श्लोक, मंत्र, देशभक्तीपर गीत, निसर्गाशी संबंधित विविध दिन जसे की, जल दिन, वन दिवस, मृदा दिन, चिमणी दिवस, विविध जातीचे साप याविषयी सविस्तर माहितीचे सत्र तसेच श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त या अनेक महापुरुषाच्या जीवन चरित्रावर वक्त्यांचे व्याख्यान, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, कागदापासून विविध वस्तू बनवणे, भाषण इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी प्रकल्पाचे कार्यवाह रविंद्रजी पूर्णपात्रे व प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शहाजी जाधव, दयानंद क्षीरसागर, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, वीरेश स्वामी, प्रा.यशवंत चंदनशिवे, लक्ष्मण पाटील, गणेश हिप्परगेकर, व्यंकटेश पोतदार, दत्ता फावडे, किशोर होनाजे, दत्ताजी जावळे, विकास होंडराव, जयकुमार शामराज, राजेंद्र सूर्यवंशी, दत्ता पोतदार, अंबादास बरुरकर, बाळू माशाळकर, डॉ.रूपाली श्रीगीरे, गणेश गुंड, नगरसेविका शामलताई माळी, विजयाताई पाटील, सुलक्षणा जाधव, सविता जाधव, यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या शिबिराचे उद्घाटन लोहारा नगर पंचायतचे नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांनी केले तर समारोप ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ कांबळे यांच्या हस्ते झाले. या संस्कार शिबीरामध्ये एकूण 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अशा प्रकारे 10 दिवसाच्या कालावधीमध्ये हे बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. या शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊसाठी नगरसेवक अविनाश माळी, वैजिनाथ जट्टे, अष्टविनायक गणेश मंडळ, अमित बोराळे, दत्तात्रय सलगरे मामा, राम वैरागकर, ज्ञानेश्वर लोखंडे, दत्तात्रय दंडगुले, पत्रकार गणेश खबोले, यांनी सहकार्य केले.