उमरगा :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बळीरराम सुरवसे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, अमर देशटवार, विक्रम मस्के, संजय गायकवाड, शाहूराज भोसले आदी उपस्थित होते.