लोहारा :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त किंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित राहून महामानव डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पूजन करुन अभिवादन केले. यावेळी संस्थेच्या वतीने समता सैनिक दलातील महिला भगिनींना साडी व पुरुष बंधूंना काठी वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, युवती सेना निरीक्षक ऍड. आकांक्षा चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, किंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सनी सोनकांबळे, सिद्धार्थ सोनकांबळे, शुभम सुरवसे, सचिन कांबळे, प्रतिक सुरवसे, ओमकार रणदिवे, शेखर सरपे, रोहित सरपे, ऋषिकेश सरपे, समर्थ सोनकांबळे, विशाल सोनकांबळे, प्रशांत कांबळे, प्रबुद्ध सरपे, बालाजी सुरवसे, शंकर कांबळे, समीर कांबळे, अनिकेत सोनकांबळे आदी उपस्थित होते.