लक्ष्मी पाटी जवळ दुचाकीचा अपघात; दोघे जखमी 

0
106

उमरगा:-  तालुक्यातील लातुर- उमरगा रोडवरील लक्ष्मी पाटी जवळ दि.16 रोजी दुपारी 4 वाजण्याच्यासुमारास एकुरगा गावाजवळ दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त  लातुर- उमरगा रोडवरील लक्ष्मी पाटी जवळ  दि. 16 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजत एकुरगा गावाजवळ दुचाकीचा  क्रमांक MH25 K 7036 वरुन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने मोटार सायकल खड्यात पडुन  दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून, अपघातातील जखमी ची नावे गणेश सदाशीव लोहार, वय- 40 रा. अणदुर, ता. तुळजापूर तर एकाची ओळख पटली नाही असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले  असल्याची माहीत रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here