डेडबाॅडी अडवून धरणा-या हाॅस्पिटल ला रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणे चा दणका जाब विचारताच दिलं नातेवाईकांच्या ताब्यात

0
13

लोहारा :-  पुणे दि.२४ एप्रिल  रोजी रुग्ण हक्क संघर्ष समिती संस्थापक प्रमुख ॲड.विजयभाऊ पंडित यांना पुणे येथील डॉ.तोडकर हाॅस्पिटल मधुन मयताचे नातेवाईक किशोर कमाने यांचा फोन आला व मयत व त्यांच्या कुटुंब गरीब असून मागील अनेक महिन्यांपासून घरातील कर्ता अजारी असल्याने खुप खर्च झाला व परिस्थिती नाजूक आहे. त्यांना मदत हवी आहे. तोडकर हाॅस्पिटल यांनी तब्बल ४ तासापासुन बिलापोटी डेडबाॅडी अडवून ठेवली आहे देत नाहीत मदत हवी आहे म्हणून तेव्हा तेथे माहिती घेतली असता, डॉ.तोडकर हाॅस्पिटल मध्ये स्व.अनिल उपचार घेत होते पण् आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. संबंधित हाॅस्पिटल मध्ये वेळोवेळी त्यांच्या नातेवाईकांनी ॲडव्हान्स बिल भरुनही शिल्लक बिल तोंडी १,४०,०००/- सांगण्यात आले अन् दिलेले बील १०५००० चे होते यात तफावत का केली आपण व बिलापोटी आपण बाॅडी का अडवून ठेवली यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर व अश्रू खवळे यांनी संबंधित हाॅस्पिटल प्रशासनाला जाब विचारला व संबंधित डॉक्टर यांनाही याविषयी जाब विचारला असता त्यांनी तब्बल १,४५,००० एवढे बिल कमी करुन डेडबाॅडी पुढे शवविच्छेदनासाठी ससून कडे पाठवून दिले… अशा अनेक घटना महाराष्ट्रात खाजगी हाॅस्पिटल मध्ये घडतात अशा बिकट दुखःच्या वेळी ही या स्वयं घोषित देवदुताना दया येत नाही त्यांना पैशाच्या पुढे माणूसकी दिसत नाही..अशा अनेक तक्रारारी दर दिवस येत रहातात रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र कडे तक्रार येताच पदाधिकारी धाव घेऊन तेथील झालेली लूट थांबविण्यासाठी सक्षम कार्य करतात. या वेळी मयत अनिल कुकडे यांचे मुलं व इतर नातेवाईक यांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे आभार मानले.यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हाॅस्पिटल प्रशासनाने दाखवलेलं सामंजस्य व सहकार्य बद्दल रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने हाॅस्पिटलचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here