उमरगा :- शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा अमन स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.
२ ते ११ मे २०२५ पर्यंत भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून,
प्रशिक्षण शिबीर फक्त ५ ते २५ वयोगटातील मुला-मुलींसाठी आहे. प्रशिक्षणासाठी वेळ सकाळी ७ ते ९ पर्यंत राहील.या प्रशिक्षणाचा शहरातील तथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक पद्माकर मोरे ,लाठी- काठी, दांडपट्टाचे मार्गदर्शक तथा प्रशिक्षक महमदरफी शेख यांनी केले असून, सदर प्रशिक्षण हे शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल येथे होणार आहे.
छत्रपती शिवरायांचा इतिहास किती थोर आहे. हे आपले गड किल्ले व शस्त्राने दाखवून दिले आहे. मनगटाच्या जोरावर शस्त्राच्या धारेवर ज्या मावळ्यांनी हा इतिहास रचला त्याच शस्त्रांना आता हाती घेऊन आपण आता स्वराज्याचे नाही तर स्वराज्यामध्ये राहून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज वाढली आहे. नकळतपणे आपल्या आजूबाजूला असलेले नराधामच भक्षक होत आहेत, आणि आता त्यांना आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येक मुलींनी शस्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने शस्त्राचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. म्हणूनच आपल्या भागामध्ये प्रथमच आपण शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण शिबिर मुला- मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सुरू करत आहोत.
यामध्ये लाठी- काठी , तलवार, दांडपट्टा, भाला, कराटे, आणि बेसबॉल अशा विविध शस्त्रांच प्रशिक्षण आपल्या भागात सुरू करत आहोत. तरी या संधीचा फायदा प्रत्येकाने आपल्या मुलांना स्वबळावर लढण्यासाठी, या कलेला आत्मसात करण्यासाठी तसेच आत्मविश्वासाने आपण प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या मुलांना या प्रशिक्षण वर्गात पाठवून द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक पद्माकर मोरे ,लाठी- काठी, दांडपट्टाचे मार्गदर्शक तथा प्रशिक्षक महमदरफी शेख यांनी केले आहे.
शिबीरात सहभागी होण्याकरीता पद्माकर मोरे मुख्याध्यापक जि. प. हायस्कुल उमरगा मो. 9421871953,आयोजक- महमदरफी शेख मुख्य मार्गदर्शक व संयोजक मो. 8788874146,अदिनाथ गोरे संयोजक मो. 9698604040 यांना संपर्क करावे शिबीराचे नाममात्र शुल्क 700/- राहील अशी माहीती प्रशिक्षक महमदरफी यांनी दिली आहे.