उमरगा :- येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पथकाच्या बौध्दीक कौशल्यामुळे चाकु, राॅडने मारहाण करून जबरी चोरी करणार्या दोघा आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकास पोलीसी जाळ्यात अडवण्यात दि.24 एप्रिल रोजी यश प्राप्त झाले.
फिर्यादी आदीनाथ निवृत्ती गायकवाड वय 55 वर्षे, व्यवसाय-वॉचमन रा. जवळगाबेट ता. उमरगा जि. धाराशिव हा.मु. समता नगर, मुबारकपुर ता.निलंगा जि. लातुर हा दि.22 एप्रिल रात्री 08.00 वा.सु. बारामती येथे कामावर परत जाण्यासाठी चौरस्ता उमरगा येथे आले परंतु बारामती येथे जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने व रात्रीचे 12 वाजले असल्यामुळे ते परत त्यांचे मुळ गावी बेटजवळगा येथे जाण्यासाठी मध्यरात्री 00.15 वा.सु. उमरगा चौरस्ता येथुन लातुर रोड कडे जाणारे रोडवर वाहनाची वाट बघत थांबले होते. त्यावेळी अंदाजे 20 ते 25 वर्षे असलेले दोघे व अंदाजे 18 ते 20 वर्षाचा एक इसम असे तिघे जण मिळुन त्यांचेकडील काळया रंगाची ऑटो घेवुन येवुन त्यातील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे पॅटचे व शर्टचे खिसे तपासले व त्यांचें हातातील बॅग हिसकावुन घेत असताना फिर्यादी याने त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने ऑटोत बसवुन पळवुन घेवुन जावुन उमरगा बायपास रोडवर कोरेगाववाडी कडे जाणारे रस्त्यावर आणुन ऑटो थांबवुन फिर्यादीस लाथा बुक्याने तसेच रॉडने हातावर, पायावर पाटीवर, डोक्यावर मुक्का मारले. एका आरोपीने त्याचे हातातील चाकुने फिर्यादीचे नाकावर, छातीवर व दंडावर मारून गंभीर जखमी करून फिर्यादीजवळील बॅग जबदस्तीने हिसकावुन घेवुन बॅगेतील एम आय कंपनीचा एक मोबाईल, व इनफिनिक्स कंपनीचा एक मोबाईल असे दोन मोबाईल, एक सिल्वर रंगाचे घडयाळ व रोख रक्कम 5550 असे जबरदस्तीने हिसकावुन घेवुन फिर्यादीस जागीच सोडुन पळुन गेले फिर्यादवरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं.२४९/२०२५ कलम ३११, ३०९ (४),३०९ (६),१३७(२), ११८(२), ११५ (२) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास पोउपनि गजानन पुजरवाड हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासात आरोपी संदर्भात कांहीएक धागादोरा नसताना व घटनास्थळावर कांहीएक पुरावा नसताना देखील पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि पुजरवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी 1) अभिषेक कालीदास शिंदे वय 22 वर्षे, 2) गणेश गोपाळ मडोळे वय 23 वर्षे, 3) विधीसंघर्षग्रस्त बालक सुरज विलास सुरवसे वय 17 वर्षे तिघे रा. मुन्शीप्लाट उमरगा ता. उमरगा यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपींचा शोध घेवुन त्यांना 12 तासांचे आत ताब्यात घेवुन त्यांना पोलीसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपी अभिषेक शिंदे व गणेश मडोळे यांना दि. 24 रोजी गुन्हयात अटक करून त्यांना मा. न्यायालयात हजर करून मा. न्यायालय यांनी त्यांची दि. 25/04/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन गुन्हयातील आरोपीकडुन फिर्यादीचे जबरीने काढुन घेतलेले 1) 1000 रू. किमतीचे Mi कं.चे मोबाईल, 2) 5000 रू. किमतीचे Infinix कं.चे मोबाईल, 3) 1000 रू. किंमतीचे सिल्वर रंगाचे मनगटी घड्याळ, 1) 2550 रू. रोख रक्कम, 5) गुन्हयात वापरलेली हत्यार चाकु, स्टीलचा रॉड व गुन्हयात वापरलेली अटोरिक्षा क्र. MH-25-M-1455 असा मुददेमाल आरोपीकडुन जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तसेच गुन्हयातील विधीसंघर्षग्रस्त बालक वय 17 वर्षे यास मा. बाल न्याय मंडळ धाराशिव यांच्यासमक्ष हजर केले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकॉ/1146 वाल्मिक कोळी, पोहेकों / 996 शिंदे पोकों/1752 भागवत घाटे, पोकों/ 1701 सिध्देश्वर उंबरे, पोकों /680 चालक राजेश वादे यांच्या पथकाने केली आहे.