तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

0
53

 

उमरगा :- उमरगा व लोहारा तालुक्याची खरीप हंगामपुर्व नियोजन आढावा बैठक सोमवार दिनांक .28 एप्रिल रोजी मा.आमदार प्रविण विरभद्रय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी तालुका कृषि अधिकारी उमरगा ज्ञानोबा रितापूरे यांनी कृषि विभागाने सन 2024-25 या वर्षामध्ये राबविलेल्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली.नंतर  तालुका कृषि अधिकारी उमरगा ज्ञानोबा रितापूरे यांनी सन 2025-26 या वर्षाचे नियोजन,बिजप्रक्रीया मोहीम,गाव बैठकाचे नियोजन,बीबीएफ पेरणी,टोकण यंत्र पेरणी,गोगलगाई निर्मूलन या विविध मोहिमांची माहिती सांगून त्यांचे महत्व व त्यामुळे शेतक-यांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. नंतर तालुका कृषी अधिकारी लोहारा महेश देवकते यांनी लोहारा तालुक्याचे सादरीकरण केले या बैठकीत श्री.गणेश पवार,उपविभागीय अधिकारी हे सहभागी होऊन त्यांनी खरीप हंगामाचे नियोजन,बियाणे व खते वापर,उपलब्धता,नियोजन याची सविस्तर माहिती घेतली. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनामधून फळबाग लागवड लक्षांकाप्रमाणे करण्याबाबतच्या सुचना दिल्या. तसेच कृ‍षि विभाग , पंचायत समिती व ईतर यंत्रणा यांना जलतारा प्रकल्प राबविण्याबाबत लक्षांक देण्यात आल्याचे सांगितले.मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड व जलतारा प्रकल्पाचे लक्षांक पूर्ण करण्याविषयी माहिती दिली.पिकविम्याच्या पुर्वसुचना दिलेल्या शेतकऱ्यांपैकी ब-याच शेतक-यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई रक्कम व अतिवृष्टी नुकसान भरपाई (ऑक्टोबर 2024) चे अनुदान अद्याप पर्यंत उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतक-यांना न मिळालेबाबतचा मा.आमदार महोदयांनी आढावा घेतला. भूगर्भातील पाणी साठा वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असा जलतारा प्रकल्प सर्व यंत्रणांच्या समन्वयाने मोहीम स्वरूपात राबविण्याच्या सूचना आमदार श्री प्रवीण स्वामी यांनी दिली.सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी समन्वयाने जलतारा प्रकल्पाची पुरेशी प्रचार प्रसिद्धी करावी व ही योजना गावस्तरावर मोहीम स्वरूपात राबविण्याच्या सूचना दिल्या. नाला खोलीकरण व जलतारा प्रकल्पाच्या कामांचे संनियंत्रण उपविभागीय स्तरावरून करण्याच्या सूचना आमदार प्रवीण स्वामी यांनी दिल्या.तसेच शेतरस्ते मोहिमेबाबत दोन्ही तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन शेतरस्ते मोकळे करण्याबाबत तहसीलदार यांना उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या. प्रशासनासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था आर्ट ऑफ लिविंग परिवार,नाम फाऊंडेशन व टाटा मोटर्स मार्फत चालू असलेल्या नाला खोलीकरण,सरळीकरण व जलतारा कामावर तांत्रिक मार्गदर्शन करणेसाठी विविध विभागांनी पुढाकार घेणेबाबत आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितले. यावेळी श्री.गोविंद येरमे,तहसिलदार उमरगा श्री.रणजित कोळेकर,तहसिलदार लोहारा, .डॉ.प्रशांतसिंह मरोड,गटविकास अधिकारी,उमरगा श्रीमती शितल खिंडे,गटविकास अधिकारी,लोहारा श्री.महेश देवकते,तालुका कृषि अधिकारी,लोहारा श्री.आर.एस.जाधवर,मुख्याधिकारी न.प.उमरगा,नायब तहसीलदार यांच्यासह उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, तालुकास्तरीय अधिकारी तसेच उमरगा तालुक्यातील कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी अभिजित पटवारी यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here