जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न

0
123

लोहारा  :- तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दि.28 एप्रिल रोजी विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी लावनीसह विविध गीतांवर दिलखुचक, ठसकेबाज नृत्य सादर करुण उपस्थितांची मने जिंकली. यात्रा समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संस्कृती नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दि.28 एप्रिल रोजी पार पडलेल्या प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे (स्त्री, पुरुष) उद्घाटन येथील प्राथमिक सहकारी पत्त संस्थेचे माजी अध्यक्ष शामसुंदर पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज महावितरण मंडळाचे निवृत्त उपअभियंता विरपक्ष स्वामी हे होते. यावेळी वायुसेना दलातील निवृत्त अधिकारी श्रीशैल येणेगुरे, युवा उद्योजक योगीराज सोळशे, महाराष्ट्र पोलीस महेश सुरवसे, वैभव सोळसे, शंकर हावळे, धनराज शिंदखेडे, गणेश कारभारी, बाबा मुल्ला, संजय चव्हाण, आप्पासाहेब तांबडे, रमेश निमशेट्टी, बालाजी हावळे, सत्येश्वर तोडकडे, प्रशांत मुरमे, सुमित कोरे, सुरेश गाडेकर, नागेश उपाशी, संजय राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धा (स्त्री, पुरुष) पार पडल्या यात ठिक ठिकाणांहून आलेल्या कलाकारांनी विविध चित्रपट गिते, शेतकरी गिते, लोकगिते, शास्त्रीय नृत्यातून आपल्या नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरी करीत प्रेक्षकांना डोलायला लावले. दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या प्रौढ गटातील लावनी व वैयक्तिक नृत्य स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्त्री गटात प्रथम पारितोषिक- अनामिका अहिरे (बीड), द्वितीय- श्वेता अवसरमोल (बीड), तृतीय- अंकिता जाधव (नेळणूर) तर पुरुष गटात प्रथम- घनश्याम सोनवणे (मुंबई), द्वितीय- गुरुनाथ तुळसकर (वेंगुर्ला), तृतीय पारितोषक (विभागून) दर्शन सोलापूरकर (पंढरपूर) व गणेश पवार (पुणे) यांनी पटकावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here