जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी  उत्साहात साजरी 

0
17

 

लोहारा :-  शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व महात्मा बसवेश्वर चौकात मान्यवरांच्या हस्ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुण अभिवादन करण्यात आले. व बसवेश्वर मंदिरात जयंती उत्सव समिती अध्यक्ष वैभव होंडराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, माजी सरपंच नागण्णा वकील, माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, नगरपंचायत माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना जिल्हा उप प्रमुख शब्बीर गवंडी, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, संगण्णा स्वामी, आप्पु स्वामी, शिवा स्वामी, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, रौफ बागवान, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, के.डी.पाटील, ओम कोरे, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक दिपक मुळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, बापु जट्टे, डॉ.चंद्रशेखर हंगरगे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, ज्येष्ठ पत्रकार बालाजी बिराजदार, गिरीश भगत, आब्बास शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ईस्माइल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, कृषी सहाय्यक शैलेश जट्टे, राजकुमार जट्टे, भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, विरेंद्र फावडे, शिवमुर्ती मुळे, मल्लीनाथ बनशेट्टी, पोलीस कर्मचारी माधव कोळी, शिव होंडराव, सचिन तोडकरी, महेश कुंभार, ओम पाटील, बाळु माशाळकर, प्रसाद मिटकरी, संतोष फावडे, कपील माशाळकर, शुभम जट्टे, मंगेश बनशेट्टी, चपळे, महेश कुंभार, शेखर पाटील, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here