उमरगा :- महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती धाराशिवच्या जिल्ह्यात समाज विकासासाठी विशेष योगदान देणार्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार उस्मानाबाद मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष कैलास चिंतामणराव शिंदे यांना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर, कॉंग्रेसचे विश्वास अप्पा शिंदे, जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, अध्यक्ष मुकुंद घुले, यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.