उमरगा :– तालुक्यातील दाबका येथील विधीज्ञ ॲड.फरहीन खान पटेल हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अनेक वर्षापासून वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असून नुकतेच यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड केली आहे.ॲड.खान यांची नोटरी पदी नियुक्त झाल्याने उमरगा लोहारा तालुका परिसरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून यांना ओळखले जाते. ॲड.खान यांची त्यांच्या गावातून व उमरगा लोहारा तालुक्यातून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.