दस्तापुर येथील जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र;  महाराष्ट्र  दिनानिमित्त सत्कार 

0
13

लोहारा :- तालुक्यातील दस्तापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वी वर्गात शिकत असलेल्या सिद्धय्या स्वामी व श्रध्दा मनोज चव्हाण या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याने दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा दस्तापुर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ पाटील, सरपंच मनीषा काळाप्पा, शालेय समिती अध्यक्ष सिधदया स्वामी, उपाध्यक्ष सुरज डावरे, ग्रा.पं.सदस्य गजेंद्र डावरे, भाजपचे सुरेंद्र काळाप्पा, ग्रामसेवक पाटील, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here