जकेकुर चौरस्ता जवळील कोल्हापुरी दणका हॉटेल समोर दुचाकीचा अपघात,एक जखमी

0
316

उमरगा :- शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या जकेकुर चौरस्ता जवळील कोल्हापूरी दणका हाॅटेल समोर दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाले असल्याची घटना दि.3 मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्यासुमारास घडली आहे.

दि. 3 मे रोजी पाच वाजता कडदोरा कडुन उमरग्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक MH13 BH 9348 ही चौरस्ता जवळील कोल्हापुरी दणका हॉटेल जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी खड्यात जाऊन पडल्याने चालक गणेश काशिनाथ पाटील, वय -30 वर्ष, रा. कडदोरा हा जखमी झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले .असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here