उमरगा :- शहरातील नगरपरिषद कार्यालय समोरील आयुब लदाफ यांच्या जनता मल्टीसर्विसेस अंतर्गत चालवण्यात येत असलेले सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र आता आदर्श नागरी सुविधा केंद्र म्हणून नामांकित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दि.2 मे रोजी उमरगा येथे विविध विषयासंदर्भात आढावा बैठक घेण्याकरीता आले असती आदर्श नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. या प्रसंगी उमरगा- लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष , उपविभागीय अधिकारी गणेश पवार , उमरगा तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे आदी मान्यवर उपस्थित होते