लोहारा :- येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे प्रधान खजांची (कॅशियर) दामोदर देविदास सुर्यवंशी यांची धाराशिव येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नतीने बदली झाल्याबद्दल लोहारा शाखेच्या वतीने सुर्यवंशी यांचा सत्कार करून व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. यावेळी लोहारा येथील युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप पुरी, डेप्युटी ब्रांच मॅनेजर मुकेश जाधव, विशेष सहाय्यक विकास जाधव, सहाय्यक विशाल बिरादार, कर्मचारी सचिन फताटे, बसय्या स्वामी, महादेव पवार, युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे, ऍड.श्री.काळे, बबलू फकीर, प्रणव पत्रिके, यांच्यासह आदी उपस्थित होते.