शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोरेगाववाडी येथे जागतिक परिचारिका दिन साजरा

0
97

 

उमरगा : – तालुक्यातील कोरेगाववाडी येथील  शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग  येथे जागतिक परिचारिका दिवस फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेचे  पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे संस्थेचे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना डॉ. विजय बेडबुर्गे यांनी परिचारिकांचे रुग्णसेवेतील महत्त्व सांगितले. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन परिचारिकांच्या योगदानाला गौरवतो. हा दिवस नर्सिंग व्यवसायातील महत्त्वपूर्ण योगदान आणि समाजासाठी परिचारिकांचे महत्त्व अधोरेखित करतो तसेचपरिचारिकांच्या समस्या आणि आव्हानांवर प्रकाश टाकतो आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देतो. प्रा.शुभम सूर्यवंशी यांनी परिचारिका दिनाचा इतिहास सांगितला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगची सुरुवात करणाऱ्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाची आठवण म्हणून साजरा केला जातो. नाइटिंगेलने क्रीमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सेवा केली, आणि तिच्या कार्यामुळे आधुनिक नर्सिंगचे महत्त्व स्थापित झाले. सन 1850 साली फ्लोरेन्स नाइटिंगेलने नर्सिंगमध्ये प्रशिक्षण घेतले. ज्यामुळे आधुनिक नर्सिंगची सुरुवात झाली. सन 1854 साली क्रीमियन युद्धात, नाइटिंगेलने जखमी सैनिकांची सेवा केली. ज्यामुळे तिची प्रसिद्धी झाली. सण 1974साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने (ICN) 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. सण 1998 साली 8 मे रोजी राष्ट्रीय विद्यार्थी परिचारिका दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रा.प्रशांत वाघमारे यांनी परिचारिका दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना रुग्णसेवेचा परिचारिका हा केंद्रबिंदू आहे. यावेळी परिचारिका दिनाबद्दल कु.संचिता बाबळसुरे , कु.विजयालक्ष्मी माळी, कु.अंकिता शिरसाट या विद्यार्थ्यांनी परिचारिका दिनाबद्दल आपले मनोगत वक्त केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी,प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख प्रा.औदुंबर जाधवर, प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.शर्वरी जगताप, कु.कांचन गायके यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.अभिजीत पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here