स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त होळी येथे सर्वरोग निदान व उपचार शिबीर

0
73

लोहारा :- तालुक्यातील होळी येथे स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान होळी, डॉ.के.डी.शेंडगे हॉस्पिटल उमरगा व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर तसेच मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास जाधव, उद्घाटक म्हणून शिवसेना युवा नेते किरण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून युवती सेना मराठवाडा निरीक्षक अ‍ॅड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे पोलीस (लोहारा) यांची उपस्थिती होती. सदरील शिबीरात २३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२७ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यासाठी ३२ रुग्ण आढळून आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे पाठविण्यात आले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप दादा मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तं.अध्यक्ष राम जाधव, युवराज कोकाटे, माजी सरपंच अजित जाधव, व्यंकट माळी, दत्ता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, संजय बिराजदार, वैभव जाधव, भाऊसाहेब मोरे, अभिषेक जाधव, चंद्रकांत माळी, दिगंबर पवार, अनिल गायकवाड, अमोल गायकवाड, संतोष राठोड, प्रदीप लोहार, प्रवीण मोरे, संतोष जमादार, सौरभ मोरे, प्रदीप जाधव, मनोज मोरे, अमोल गायकवाड, आदेश गायकवाड, अतुल मोरे, यांच्यासह ग्रामस्थ व राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here