उमरगा:- महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या विभागस्तरावरील दुस-या टप्याच्या निकालात मराठवाड्यातील धाराशिव जिल्हयातील उमरगाचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या कौशल्य पुर्ण कार्यामूळे उमरगा पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक गटातून बाजी मारत अव्वल स्थान पटकाविले असून, ही बाब उमरगा शहर व परिसरा करीता तसेच धाराशिव जिल्हयाकरीता अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मराठवाड्यातील नांदेड मधील देगलूर उपविभागीय अधिकारी व नांदेड शहर तहसीलने बाजी मारत अव्वल स्थान पटकाविले,तर उदगीर-धाराशिव, परभणी-चाकूर अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिले.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यालयांनीदेखील बाजी मारली. २९ महसूल वगळता इतर विभागांच्या कार्यालयांसाठी हा उपक्रम होता.उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, उपविभागीय तालुका कृषी अधिकारी,पोलिस निरीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रकल्प अधिकारी, बालविकास, बालसंरक्षण अधिकारी, मजीप्रा उपअभियंता पाणीपुरवठा, सहा. पशुसंवर्धन, आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, नगरपरिषद सीओ, सा.बां. जलसंपदा, महावितरणचे उपअभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, सहा निबंधक, उपकोषागार अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, गटशिक्षण अधिकारी या कार्यालयांसाठी ही स्पर्धा होती.