भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा  लोहारा तालुका पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार

0
168

लोहारा :-  धाराशिव भारतीय जनता पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका पदाधिकारी यांच्यावतीने प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे दि.17 मे  रोजी भाजपा नुतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य आप्पाराव पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य काशीनाथ घोडके, अजित माने, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here