उमरगा: – शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोरेगाववाडी, उमरगा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे संस्थेचे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे उपस्थित होते.विद्यापीठा अंतर्गत घेण्यात आलेली हिवाळी परीक्षा 2024 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. बी.एस्सी. नर्सिंग प्रथम वर्षातील कु. अमोगसिद्ध व्हनमाने (77.6%), कु.समीक्षा सोनटक्के (75.2%), वष्णवी सागर (72.8%) तसेच द्वितीय वर्षातील कु. प्रसाद हंगे (77.71%), कु.बालाजी केंद्रे (76.57%), कु. विश्वजीत पांचाळ (75.42%) व तृतीय वर्षातील कु. मोनाली ननावरे (78%), कु. शुभांगी आंबीलगे (77.33%), कु. अंकिता सिरसाट (77.33%) व कु. नूतन वालदे (77%) असे यश संपादन केले. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सतत सराव, मेहनत, वाचन, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. विजय बेडदुर्गे यांनी विदयार्थ्यांना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी,प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख प्रा.औदुंबर जाधवर, प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मोनिका धुरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.अभिजीत पाटील यांनी केले.