उमरग्यातील वीज समस्यासंदर्भात काँग्रेसची गांधीगीरी ;महावितरणचे उप अभियंता मोरे यांचा उपहासात्मक सत्कार 

0
321

उमरगा :- शहरातील आठ ते दहा दिवसापासून सुरु असलेल्या वीजेच्या लपंडावाच्या समस्यासंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते अश्लेश भैया मोरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्ट मंडळ कार्यालयात गेले असता. मुख्य अभियंता गैरहजर असल्याने अभियंता मोरे यांना शिष्टमंडळाने निवेदन देवून, वीज लपंडावाच्या समस्येच लवकरात लवकर निरसण करण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करुन मोरे यांचा उपहासात्मक सत्कार करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे नेते नानाराव भोसले, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय वाघमारे, युवक काँग्रेस धाराशिव चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय दळगडे, ॲड. पोद्दार , बाबा मस्के, तालुका उपाध्यक्ष गुरव, काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल सरपे, युवक शहराध्यक्ष इनामदार, प्रकाश चव्हाण, निजामभाई व्हंताळे, विशाल काणेकर, जालिंदर सोनटक्के, जिवन सरपे, तसेच बरेच पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here