अवकाळी पावसात हिप्परगा रवा येथील रवींद्र जाधव यांचे राहते घर जमीन दोस्त, मोठ्या प्रमाणात नुकसान 

0
355

लोहारा:–  शहरासह तालुक्यात दि.21 मे 2025 रोजी आवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्यासह पावसात लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील रवींद्र हनुमान जाधव यांचे राहते घर जमीन दोस्त झाले त्यांचे अनेक संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यात अनेक नागरिकांच्या घरावरील, दुकान, शेतातील गोठ्यावरील पत्रे पत्रावळी सारखे उडून गेले, पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून अंगणात तळे साचले होते. ठिकठिकाणी विजेचे पोल, तारा जमीनदोस्त झाल्या आहेत. सुसाट वादळी वारे, व आवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अवकाळी पावसात व वादळी वाऱ्याने मोठा धुमाकूळ घातला. या वादळी वाऱ्याने व पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून संबंधितास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here