- लोहारा:– संत सेवालाल महाराज सप्ताह निमित्त लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी (पश्चिम तांडा) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21 हजार रु चे विजेता संघ किंग 11, लोहारा या संघाने पटकवला तर उपविजेता संघ 11111 रु जय जवान जय किसान संघ, पश्चिम तांडा संघाने पटकावले…..! तृतीय पारितोषिक 5555 रु जय शिवराय संघ, जळकोटवाडी या संघाने पटकवले. यावेळी पारितोषिक वितरण ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व महादेव कारभारी व विकास पवार, ग्रा.पं.सदस्य प्रवीण बोनदाडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी गाव व परिसरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी आयोजक भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे मेजर अमोल जाधव, मेजर मुकेश राठोड यांनी परिश्रम घेतले.
Home ताज्या बातम्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक संघ किंग 11, लोहारा, उपविजेता...