लोहारा :– भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान च्या मुसक्या आवळून “ऑपरेशन सिंदुर” च्या माध्यमातून अतिशय चालाखीने यशस्वी करून दाखवले. या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पायी “तिरंगा यात्रा” दि. 25 मे 2025 रोजी सकाळी 11 वा.भारतमाता मंदिरापासुन सुरुवात करण्यात आली. हि तिरगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक (जगदंबा मंदिर) मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या यात्रेला शहरासह तालुक्यातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेत देशभक्तांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम् “, ” अशा घोषणा दिल्या. तसेच यावेळी तहसीलकार्याजवळ माजी सैनिक राजेंद्र सुर्यवंशी, सुधीर पाटील, रमेश ठेले, महादेव सलगर, प्रकाश मुळे, शिवाजी मुलगे, चंद्रकांत थोरात, अजय जाधव, इंद्रजित सुर्यवंशी, दिलीप पवार, यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, भाजपा नेते माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक दिपक मुळे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, विक्रांत संगशेट्टी, भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी गटनेते अभिमान खराडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, दिलीप पवार, हाजी बाबा शेख, भाजपा व्यापारी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्र्वर साळुंके, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, विनोद मुसांडे, भाजपा तालुका चिटणीस युवराज जाधव, ईस्माइल मुल्ला, बसवराज पाटील, संजय कदम, सतिश गिरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयेश दंडगुले, भाजपा प्रशिध्दी प्रमुख निकेश बचाटे, कल्याण ढगे, सरपंच व्यंकट कागे, मोहन जेवळीकर, काशीनाथ घोडके, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार, बबनजी महाराज, खंडु जाधव, विजय महानुर, संजय दरेकर, दत्ता पोतदार, अॅड. रविकांत भोंडवे, अॅड. संगमेश्वर माशाळकर, सुनिल सुर्यवंशी, परमेस्वर माशाळकर, शंकर जाधव, संजय लांडगे, दत्तात्रय दंडगुले, प्रविण कांबळे, शिवा थोरात, शुभम गोसावी, रोहीत नारायणकर, पांडुरंग नारायणकर, विकास थोरात, योगेश बाभळे, शुभम माळी, अजय गोसावी, समिर हेड्डे, बळी रोडगे, ज्ञानेश्वर काडगावे, अंगद भोंडवे, शिवराज चिलगुंडे, श्रीकांत बिराजदार, जितु कदम, महादेव गाडेकर, सौरभ कागे, यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रभक्ती व सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या रॅलीला दिलेल्या प्रतिसादामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.