इकबाल मुल्ला
लोहारा :– विजेचा शॉक लागुन 18 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना लोहारा शहरात दि.26 मे 2025 रोजी घडली. लोहारा शहरातील शिवनगर येथील समर्थ विष्णु क्षीरसागर (वय 18) हा सोमवारी दुपारी 12 वाजायाच्या सुमारास घरातील लाईट बंद पडल्याने विजेच्या मीटरमध्ये वायर बसवत होता. यावेळी त्याला विजेचा धक्का बसला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे प्रथमोपचार करुण धाराशिवला हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य आई, वढील, एक भाऊ असा परिवार आहे. यांच्या मृत्यु मुळे शहरात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे