डीएपीला पर्यायी खतांचा वापर करा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

0
18

धाराशिव:–  खरीप हंगामाची सुरुवात झाल्याने डीएपी (Di-ammonium Phosphate) खताची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. डीएपीमध्ये १८% नत्र व ४६% स्फुरद असून ते एकत्रित खत आहे. मात्र,या खतावर केवळ अवलंबून राहणे टाळावे व पर्यायी खतांचा वापर करावा,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.डीएपीला पर्याय म्हणून खालील खते उपयुक्त ठरू शकतात:सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) – १६% स्फुरद व ११% गंधक असलेले हे खत जमिनीची गुणवत्ता वाढवते.ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) – यामध्ये ४६% स्फुरद असते, परंतु नत्र नसल्याने यासोबत युरिया खत वापरावे लागते.संयुक्त खते – जसे की १०:२६:२६, १२:३२:१६, २०:२०:०:१३ यामध्ये नत्र व स्फुरद दोन्ही असतात व पीक गरजेनुसार त्यांचा उपयोग करता येतो.जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त डीएपीवर अवलंबून राहू नये व पर्यायी खतांचा योग्य वापर करून उत्पादनात वाढ साधावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here