लोहारा :- धाराशिव शहरातील खाजा नगर येथे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे नवनियुक्त चेअरमन सतीश दंडनाईक यांचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला. या सत्कार समारंभाचे आयोजन भाजप अल्पसंख्यांक मोर्चा धाराशिव शहराच्या वतीने करण्यात आले होते. प्रथम दत्ताभाऊ कुलकर्णी आणि सतीश दांडणाईक यांचा सत्कार शहराध्यक्ष फरमान काझी आणि युवानेते मुजमिल काझी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या वेळी बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्ष हा अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा एकमेव पक्ष आहे. समाजाला राजकारणात योग्य प्रतिनिधित्व व संधी देण्याचे कार्य भाजपने सातत्याने केले आहे. पुढे बोलताना कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा सत्कार म्हणजे माझ्यावर टाकलेली नवीन जबाबदारी आहे. यापुढील काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. सर्वांना सोबत घेऊन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.” तसेच पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करेल असेही कुलकर्णी यांनी यावेळी आवर्जून बोलून सांगितले, कुलकर्णी यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. याकार्यक्रमास भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष निहाल काझी, जुल्फेकार काझी, माजी नगरसेवक अक्षय ढोबळे, पुष्पकांत माळाळे, इलियास पिरजादे, फहाद सिद्दिकी, पटेल सर, बिलाल रजवी, अलीम पठाण, मगबुल टकारी, फिरोज पठाण, महमूद मुजावर, शोहेब रजवी, सादिक शेख आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चा धाराशिव शहराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.