राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव येथे विविध कार्यक्रम 

0
28

लोहारा:– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा आणि प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र – भर भाजपाच्या वतीने त्रिशताब्दी जन्मोत्सव विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातही भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, मुंबई चे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे नेते माजी आ सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील, यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहाराजे निंबाळकर, अभियानाचे जिल्हा संयोजक इंद्रजीत देवकते यांच्या नेत्रत्वात कार्यक्रम पार पाडला. यामध्ये व्याख्यान, वेशभुषा स्पर्धा तथेच विविध क्षेत्रात नावलौकिक व योगदान देणाऱ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इतिहास संशोधक तथा अभ्यासक प्रा.डॉ.सतिश कदम यांनी युवक व युवतीशी संवाद साधताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे देशाप्रती असणारे योगदान तसेच महिला असूनही एक उत्तम प्रशासक व कितीही संकट आले तरी खचून न जाता प्रजेच्या संरक्षणासाठी व हितासाठी तत्पर राहणे व वेळप्रसंगी युद्धनितीतील मुत्सद्दीपणा व आजच्या काळामध्ये पालकांनी व विद्यार्थ्यांनी कश्या प्रकारचे जीवनशैली असायला पाहिजे आपल्या पाल्याचे पालन पोषण व शिक्षण करताना अश्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. यावेळी आधुनिक सावित्री प्रमाणे आपल्या पतीचा जीव वाचवणाऱ्या सौ.लता वैजिनाथ कसबे यांनी आपल्या पतीच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याने किडनी दान केली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला व आपल्या मुलाला किडनी दान करणाऱ्या माता सौ.इंदुबाई बळीराम जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर क्रीडा (कुस्ती – ज्युडो) क्षेत्रातील कु.सई गणेश सापते, कु.पार्थ गणेश सापते, कु.वैभव गोविंद शिडोळे, कु.ओंकार राजेंद्र सोनटक्के, कु. ओमप्रसाद अमरुशी निंबाळकर – कॅडेट राष्ट्रीय मेडल ब्रांस खेलो इंडिया युथ गेम्स, कु.संस्कृती नानासाहेब बोराडे – स्केटिंग म्युजीकल राष्ट्रीय, कु.मनोज दिनकर जाधव.खो – खो क्रीडा क्षेत्रातील कु.संपदा मोरे-सुवर्ण पदक, कु. संध्या सुरवसे-सुवर्ण पदक, कु.सुहानी धोत्रे-सुवर्ण पदक व जानकी पुरस्कार, कु.तन्वी भोसले- सुवर्ण पदक व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, कु.मैथीली पवार- इला पुरस्कार, कु.विजय जयराम शिंदे- रौप्य पदक व अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कास्य पदक, कु.राज चंद्रजित जाधव- सुवर्ण पदक, देशातील सर्वउत्कृष्ट खेळाडू भारत सरकार पुरस्कार, कु.अनिकेत सुरेश पवार- रौप्य व कास्य पदक.कराटे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पूर्ण कामगिरी करणारे खेळाडू-साईराज अनिल माने, रमणी प्रविण म्हेत्रे, रिया राहुल माने, वेदश्री आशिष जोशी, वेदांत शरद मोटे, सतेज संजय चव्हाण, नंदन पांडुरंग गोरे, हर्षवर्धन राहुल कंकाळ, शताक्षी राहुल कंकाळ, यशराज नागनाथ धनके, आदर्श अमोल यादव, वसंत प्रशांत लोखंडे, वसंत प्रशांत लोखंड, पार्थ नितीन पाटील, बोधिका धनजय जानराव, श्रेया धनंजय जानराव, बोराडे संस्कृती नानासाहेब. व्हॉलीबौल क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पूर्ण कामगिरी करणारे खेळाडू-कु.श्रेयश भैर खांडेकर, कु.प्रथमेश नागनाथ गंगणे, कु. सुमित संतोष जाधव, पियुष लामतुरे, प्रशिक्षक आशुतोष माने यांचा सत्कार करण्यात आला. सेवा क्षेत्रातील-राम ढेकणे, अतुल करवड यांचा सन्मान केला. यावेळी वेशभूषा स्पर्धे मध्ये देखील मोठ्या प्रमाणात चिमुकल्यांनी अहिल्यादेवीची वेशभूषा करून सादरीकरण केले त्यामध्ये प्रामुख्याने विजेते व प्रोत्साहनपर विजेते- विजेत्याचे नाव प्रथम क्रमांक-विराक्षी लक्ष्मण देवकते, द्वितीय क्रमांक-वैष्णवी गणेश महानवर, तृतीय क्रमांक-गौरी आतिश ठवरे, प्रोत्साहनपर-माधवी मनोज गोरे,मानवी मनोज गोरे,रिंकू शंकर देवकते,आरती मनोज सलगर, रेवती गणेश थोरात,अमृता मनोज सलगर,विजेत्या व सहभागी स्पर्धकांना, रोख रक्कम,सन्मानपत्र व शाल देण्यात आली.श्री छत्रपती शिवरायांचे ध्येय मंत्राचे पत्र सर्व मान्यवरांना, खेळाडूंना यावेळी दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती खंडेराव चौरे (माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, धाराशिव), सुनील काकडे (मा. न. प.धाराशिव), मा.भारत डोलारे (मा.जि.प. सदस्य), सौ.नंदाताई पुनगुडे (जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा), युवराज नळे, (प्रदेश कार्यकारणी सदस्य), अभय इंगळे (शहराध्यक्ष, भाजपा, धाराशिव), (मा.गटनेते न.प. धाराशिव), पांडुरंग पवार (मराठवाडा संयोजक, सोशल मिडिया भाजपा), निहाल काझी, दर्शन कोळगे, संदीप इंगळे, विलास लोंढे, निलेश शिंदे, शितल देशमुख, सतीश घोडेराव, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे स्वरूप व सर्व मान्यवरांचे माहिती व स्वागत भाजपा युवा मोर्चाचे राजसिंहाराजे निंबाळकर यांनी केली, जिल्ह्यातील त्रिशताब्दी बद्दल ची माहिती इंद्रजीत देवकते, भाजपा सरचिटणीस तथा अभियान संयोजक, सूत्रसंचालन सचिन लोंढे, प्रदेश चिटणीस भाजपा अ.जा मोर्चा यांनी केले व वेशभुषा स्पर्धेचे परिक्षक म्हणुन सौ.संगिता पाटील या होत्या तर आभार गणेश एडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका अध्यक्ष-अजित खापरे, शहराध्यक्ष-प्रसाद मुंडे, शहर संयोजक-ओंकार देवकते, नानासाहेब पाटील, जिल्हा विद्यार्थी संयोजक (अध्यक्ष)-धनराज नवले, विद्यार्थी शहर संयोजक-चैतन्य माने, अभिषेक पवार, नवनाथ सोलंकर, अरविंद देवकते, संग्राम पडवळ, सार्थक पाटील, समर्थ लवटे, गणेश देवकते, समर्थ देवकते, मुकेश सूळ, अभिषेक तांबे, सागर दंडनाईक, जयसिंग गायकवाड, सारंग जोशी या युवा मार्च्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here