उमरगा :- येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषद येथे तर नळदुर्ग नगरपरिषद चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांची धाराशिव जिल्ह्यातील लोहारा बु. नगर पंचायत येथे नियतकालीन बदली करण्यात आले असल्याचे आदेशीत पत्र दि.30 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४५४) मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने नियतकालीन बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने नियतकालीन बदल्या करण्यात आल्या असून दि.30 मे रोजी संबंधित अधिकारी यांनी सद्या कार्यरत असलेले पदमुक्त होवून ज्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे तेथे रुजु झाल्याचा अहवाल वरीष्ठ अधिकारी यांना सादर करावे असे आदेश राज्य शासनाच्या पत्रा च्या माध्यमातून देण्यात आले आहेत.