लोहारा:– राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.31 मे 2025 रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा वैशालीताई खराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, माजी सरपंच नागण्णा वकील, पं.स.माजी सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकर जट्टे, माजी नगराध्यक्षा पोर्णिताई जगदिश लांडगे, डॉ. आम्लेश्वर गारठे, डॉ.गुणवंत वाघमोडे, उबाठा गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रेम लांडगे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, राष्टवादी कॉग्रेसचे हाजी बाबा शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक विजयकुमार ढगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक दिपक मुळे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, अल्पसंख्यक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, के.डी.पाटील, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, उबाठा गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, रघुविर घोडके, कॉग्रेसचे दत्ता गाडेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, प्राचार्य शहाजी जाधव, सुरेश वाघमोडे, प्रमोद पोतदार, अशोक तिगाडे, सुरेश पांढरे, विकास घोडके, बालाजी विरुदे, प्रशांत लांडगे, उमेश देवकर, संजय शिंदे, डॉ.दिनेश झेंडगे, जयाराम शिंदे, अंबादास विरुदे, विजय महानुर, महेश वाघे, जयसिंग बंडगर, पांडुरंग घोडके, संदीप घोडके, अनिल विरोधे, कृष्णा वीरुदे, राहुल विरुदे, सुमित महनुर, धवल खताळ, हर्षवर्धन खताळ, नितीन वाघे, शिवा तीगाडे, महेश घोडके, ऋषिकेश तिगाडे, वैभव घोडके, बाळासाहेब घोडके, गोपाळ घोडके, ओमकार लांडगे, जयंती उत्सव समिती उपाध्यक्ष आकाश विरुदे, सचिव प्रदीप घोडके, सहसचिव अमित महानुर, कोषाध्यक्ष श्रीकांत तिगाडे, प्रकाश भगत, रोहन खराडे, विकास घोडके, संभाजी विरुदे, बालाजी विरुदे, अंबादास विरुदे, यांच्यासह समाजबांधव,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.