लोहाराचे  तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

0
86

लोहारा :- तालुक्यातील शेतरस्त्याची तक्रार दाखल होताच तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा-याचे मंडळ अधिकारी बाळासाहेब भरनाळे यांनी तालुक्यातील शेतरस्त्यांचा वाद संबंधित वादी, प्रतिवादींशी चर्चा करुन तर काही ठिकाणी जुन्या महसुली अभिलेखांचा आधार घेऊन कायदेशीर नियमाप्रमाणे सोडवली. या कामाची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली आहे. सस्ती अदालतमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना दि ३० मे रोजी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्या आले. यावेळी मंडळ निरीक्षक बाळासाहेब भरनाळे उपस्थित होते. तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक बाळासाहेब भरणाळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लोहारा मंडळातील आपसी वादातील रखडलेले व अतिक्रमण झालेले ९० रस्ते ४० कि, मी, चे खुले केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here