बीरुदेव मंदिर जवळ दोन दुचाकीचा अपघात दोघे जखमी 

0
1315

उमरगा :- तालुक्यातील लातुर- उमरगा रोडवर बीरुदेव मंदिरा जवळ दोन दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी झाले असल्याची घटना दि. 1 रोजी दुपारी ठीक 12:45 वाजता घडली आहे.लातुर- उमरगा रोडवरील बीरुदेव मंदिरा जवळ मोटार सायकल क्रमांक MH25AV 9072 व MH25AB 7511 या दोन गाड्यांची टक्कर होऊन पांडुरंग बाबुराव कुंभार वय 37 राहणार एकुरगा व महेश अंकुश पवार वय 30 राहणार बाबळसुर हे दोघे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले.असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here