मार्डी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्यमिरवणूक संपन्न

0
109

 

लोहारा :– तालुक्यातील मार्डी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्यमिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोहारा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचा सत्कार चेअरमन प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन प्रवीण पाटील, माजी सरपंच अण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, पिंटू देवकर, अण्णा देवकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, अंकुश देवकर, अशोक जमादार, धनु देवकर,शिवाजी यमगर, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here