उमरगा:- – तालुक्यातील जकेकूर येथे ग्रामपंचायत कार्यालय उमेद जीवन ज्योती अभियान व वॉटरशेड च्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 03 रोजी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीजप्रक्रिया करणे व उगवणक्षमता तपासणी, मातीची गुणवत्ता तपासणे, बीबीएफ पेरणीचे फायदे, एकदल, द्विदल वर्गीय पिकांच्या वाढीसाठी मातीत आवश्यक असणारे घटक नत्र, स्पुरद, पालाश, त्याच बरोबर अझोटोबॅक्टर, रायाझोबीयम, अझोस्पिरि्लीयम, गांडूळाचे उपयुक्तता याविषयी माहिती देण्यात आली. आयोजित शेतीशाळेत वॉटर शेड चे योगेश घोगले, अनिल जाधव, अन्सार मोमीन, उमेद तालुका व्यवस्थापक अनिल भंडारे, प्रभाग समन्व्यक अविनाश भैरट, , सुनंदा वळसे, हिरवई महिला फार्मर प्रॉडसर कंपनी च्या गोकर्णा सूर्यवंशी, ग्रामसेवक श्रीकांत माने, लइका औटी, उमेद गटाच्या सीआरपी माया जमदाडे, वंदना सोनकांबळे, मोहिनी माने, श्रीदेवी कांबळे, साक्षरता सखी कल्पना जाधव, कृषी युवा प्रशिक्षणार्थी सचिन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य चेतन गायकवाड, ऑपरेटर नवनाथ कांबळे, राहुल दूधभाते, तसेच महिला व पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायती मार्फत उपस्थितांना बायो फर्टीलाईजर चे वाटप करण्यात आले.