लोहारा:– बकरी ईद हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी केले. लोहारा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दि.4 जून रोजी बकरी ईद च्या अनुशंगाने शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांची प्रमुख म्हणुन उपस्थित होती. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी मार्गदर्शन करुण कांही सुचना केल्या. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष हाजी अमीन सुंबेकर, उबाठा गट शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उबाठा गट शिवसेना शहर प्रमुख सलिम शेख, माजी नगरसेवक आयुब शेख, राष्टवादी कॉग्रेसचे हाजी बाबा शेख, नगरसेवक आरिफ खानापुरे, नगरसेवक प्रशांत काळे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ग्रामपंचायत माजी सदस्य महेबूब गवंडी, गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुकाध्यक्ष तानाजी माटे, तालुका सचिव संजय नरगाळे, पोलीस पाटील, लक्ष्मी यादव, शितल साळुंके, शुकराज कदम, दिपक जाधव, निळकंठ कोठावपळे, कुंडलीक पाटील, नितीन सोनवणे, मारुती लोहार, बिरुदेव सुर्यवंशी, सहदेव गिराम, दादासाहेब मुर्टे, माधव कोळी, यांच्यासह नागरिक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.