लोहारा:– येथील उप डाकघर कार्यालयातील पोस्ट मास्तर उद्धव खल्लारे पाटील यांची सहाय्यक विभागीय कार्यालय लातुर येथे बदली झाल्याबद्दल लोहारा पोस्ट ऑफिसच्या वतीने कल्हारे -पाटील यांचा सत्कार करुन व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. यावेळी तुळजापूर पोस्ट उपविभाग कार्यालयातील इन्स्पेक्टर अनिल जाधव, ग्रामीण डाक सेवक कल्याण कांबळे, शिवराज झिंगाडे, माधव हाक्के, यांच्यासह आदी उपस्थित होते.