लोहारा:– येथील नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची प्रशासकीय स्तरावरुन इतरत्र बदली झाल्याने त्यांच्या जागी नवीन मुख्याधिकारी म्हणून लक्ष्मण कुंभार यांनी नुकताच नगरपंचायतीचा दि.4 रोजी पदभार घेताच येथील कर्मचारी व कामाचा आढावा घेत अनेक कामावर प्रत्यक्षात भेटी देत अपुर्ण कामे पूर्ण करण्या बाबत कारवाईचे आदेश दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून लोहारा नगरपंचायतीचा कारभार प्रभारी रामभरोसे पर सुरू होता. त्यात लोहारा नगरपंचयतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार लाभल्याने आता तरी शहराचा विकास होईल का अशी चर्चा शहर वासीयातुन केली जात आहे. कुंभार यांनी पदभार घेताच उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक दिपक मुळे, शाम नारायणकर, हरीभाऊ लोखंडे, शहरप्रमुख सलीम शेख, सुधीर घोडके, महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, आदीने त्यांचा यथोचित सत्कार केला.