लोहारा:– येथील नगरपंचायत क्षेत्रातील हद्दीतील विविध भागातील नागरीकांनी बकरी ईद निमित्त गोवंश तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी शहरवासीयांनी घ्यावे असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी दि.06 रोजी कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या एका प्रसीध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.शहरातील नागरिकांना कळविण्यात येते कि, दि. तसेचसर्व ०७.०६.२०२५ ते दिनांक ९.६.२०२५ रोजीपर्यंत बकरी ईद निमित्त लोहारा बु. शहरात गोवंश हत्या होणार नाही तसेच कोणताही अनुसूचित प्रकार होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनाकडून काळजी घेण्यात यावी, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९९५ अनुसार संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी लागू आहे. त्याचे पालन करणे सर्व शहरवाशीयांना बंधनकारक असून सर्वांनी कायदाचे पालन करावे आवाहन लोहारा नगरपंचायत चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे.