लोहारा शहरासह तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

0
83

लोहारा :–  शहरासह तालुक्यात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवाच्यावतीने सामुदायिक ईद ऊल – अदाची नमाज अदा करुण बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. लोहारा शहरातील ईदगाह मैदानावर धर्मगुरु फज्जुसाहब कादरी यांच्या नेतृवाखाली मुस्लिम बांधवानी सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी धर्मगुरु फज्जुसाहब कादरी यांनी बकरी ईद विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या नमाज नंतर शहरासह तालुक्यात हिंदु बांधवानी मुस्लिम बांधवाची गळाभेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here