उमरगा :- मुंबई- हैद्राबाद महामार्गावरील बलसुर मोड जवळ दि. 7 रोजी दुपारी ठीक 2:10 वाजता दुचाकी- ऑटोची समोरा समोर धडक झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
महालिंगराय वाडी येथुन उमरग्याकडे येणारी दुचाकी क्रमांक MH5AX 0328 व उमरगा कडून बलसुर कडे जाणारा ऑटो क्रमांक MH 25 7358 यांची समोरा समोर धडक होऊन, बालाजी सुभाष जगदाळे रा.उमरगा, धनाजी प्रेमनाथ भुसाळ रा. महालिंगंराय वाडी, ज्ञानोबा जगनाथ सोमवसे रा. महालिंगंराय वाडी हे तीघे जखमी झाले असून सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा – चौरस्ता येथे मागील तेरा वर्षे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.