भाजपाचे नेते राहुल पाटील सास्तुरकर यांचे चिरंजीव नहुष पाटील यांचे अपघाती निधन

0
899

 

इकबाल मुल्ला

लोहारा:– भारतीय जनता पार्टी नेते राहुल पाटील सास्तूरकर आणि माजी जि.प.सदस्य तथा सरपंच शितल पाटील यांचे चिरंजीव नहुष राहूल पाटील (वय 21) यांचा पहाटे 3 वाजता लातूर येथे अपघाती निधन झाले. यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांचा अंत्यविधी सास्तूर येथे दि.8 जून रोजी दुपारी 4 वाजता शोकाकुल वातावरण करण्यात आला. अंत्यविधी झाल्यानंतर आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अंत्यविधीस माजी खा.रुपाताई पाटील निलंगेकर, माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड़, शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले, आ.प्रविण स्वामी, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा लातूर शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपा नेते माजी सभापती अॅड. अभय भैय्या चालुक्य, नेते बाबा पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, शिवसेना जिल्हा संघटक अॅड. दिपक भैय्या जवळगे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुलतान शेठ, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, अॅड. नितीन भोसले, जि.प.माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, राष्टवादी कॉग्रेसचे दिग्विजय   शिंदे, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, लोहारा शहरातील नगरसेवक, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जगदिश लांडगे, भगवान पाटील, इकबाल मुल्ला, बालासिंग बायस, संपत देवकर, प्रविण चव्हाण, बालाजी चव्हाण, अमोल पाटील, सुधीर घोडके, यांच्यासह धाराशिव, लातूर जिल्ह्यातून विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, महिला, ग्रामसस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या पाश्चात्य आजोबा, वडील, आई, असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here