लोहारा:– शिवसेनेचे धाराशिव शहर प्रमुख सनी पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे भाजप परिवारात आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सनी पवार यांच्यासह त्यांचे सहकारी शिवसेना कार्यकर्ते प्रकाश पवार, सतीश पवार, रत्नदीप पवार, राहुल सुरवसे, आकाश खोत, आकाश जगताप, राजेश म्हेत्रे, संदीप पवार, संतोष गाडे, प्रेम काळे, बाजीराव शिंदे, प्रशांत वाघमारे, ऋषी विरकर, सुनील काळे, विजय भगत, अजय भगत, अश्रूबा वारे, अर्जुन पवार, आशिष सुरवसे, विशाल गोरे, अक्षय शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.